स्वाइन फ्लूवर आरोग्य उपसंचालकांची कार्यशाळा
By admin | Published: April 21, 2017 01:54 PM2017-04-21T13:54:33+5:302017-04-21T13:54:33+5:30
आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी विभागातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्यांची गुरुवारी कार्यशाळा घेतली.
विभागातील अधिकारी-कर्मचार्यांची उपस्थिती : जनजागृतीचा अभाव अधोरेखित अकोला : अकोल्यात फैलाव होत असलेल्या स्वाइन फ्लूबाबत काळजी घेण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी विभागातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्यांची गुरुवारी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, डॉ. विजय जाधव, डॉ. शर्मा, डॉ.भास्कर सगणे, डॉ. भावना मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हय़ातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी रुग्णांचे निदान आणि त्याने घ्यायची काळजी, याचे प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व ठिकाणी स्वाइन फ्लूसाठी आणि उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. सोबतच जनतेमधील या रोगाबाबतची भीती काढवी, जनजागृतीसाठी बॅनर, भित्तीपत्रके लावावीत, ग्रामसभेत आजाराविषयी माहिती द्यावी, शाळा, अंगणवाडी यातून नागरिकांना मार्गदर्शन करावेत, असे आवाहन या कार्यशाळेतून करण्यात आले, तसेच दूषित पाण्यामुळे आणि आरोग्याची काळजी न घेतल्याने वाढणार्या रोगांबाबत येथे सांगितले गेले. सदर कार्यशाळेत आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी माहिती दिली. नागरिकांना आरोग्य शिक्षण देऊन सक्षम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.