कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेला मिळाले बळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:18 AM2020-12-22T04:18:10+5:302020-12-22T04:18:10+5:30
‘व्हीआरडीएल लॅब’मुळे विषाणूजन्य आजारांचे निदान अकोल्यातच दोन वर्षांपासून प्रलंबित व्हीआरडीएल लॅब कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली. ही लॅब प्रामुख्याने स्वाईन ...
‘व्हीआरडीएल लॅब’मुळे विषाणूजन्य आजारांचे निदान अकोल्यातच
दोन वर्षांपासून प्रलंबित व्हीआरडीएल लॅब कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली. ही लॅब प्रामुख्याने स्वाईन फ्लूसह इतर विषाणूजन्य आजारांच्या निदानासाठी प्रस्तावित होती. ही लॅब सुरू झाल्याने आता स्वाईन फ्लूसह इतर विषाणूजन्य आजारांचे निदानही अकोल्यातच होणार आहेत.
प्लाझ्मा युनिट कार्यान्वित
कोविडच्या रुग्णांवर अँटीबॉडीजच्या माध्यमातून उपचार करता यावे, यासाठी सर्वोपचार रुग्णालयातील सासकीय रक्तपेढीत प्लाझ्मा फोरेंसिस युनिट सुरू करण्यात आले. प्लाझ्मा संकलनासाठी १३ लाक ४० हजार रुपयांची अत्याधुनिक मशीन मिळाली आह.
सुपरस्पेशालिटीची प्रतीक्षा कायमच
सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, आवश्यक वैद्यकीय उपकरणेही दाखल झाली आहेत. मात्र, पदनिर्मिती आणि पदभरतीमुळे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. मध्यंतरी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील चारही सुपरस्पेशालिटी रुग्णालयांसाठी ८०० पदांना मंजुरी दिली आहे, मात्र त्या पदांच्या भरतीप्रक्रियेसंदर्भात ठोस निर्णय झाला नाही.