ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत आरोग्य यंत्रणाच संभ्रमात (टिप- बातमी डबल पेस्ट झाली होती. मी डीलिट केेली आहे, तरीही कृपया बातमी पाहणे.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:21 AM2021-03-01T04:21:29+5:302021-03-01T04:21:29+5:30

देशभरात १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच ४५ वर्षांवरील गंभीर ...

The health system itself is confused about the vaccination of seniors (Tip - the news was double-pasted. I have deleted it, but please watch the news.) | ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत आरोग्य यंत्रणाच संभ्रमात (टिप- बातमी डबल पेस्ट झाली होती. मी डीलिट केेली आहे, तरीही कृपया बातमी पाहणे.)

ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत आरोग्य यंत्रणाच संभ्रमात (टिप- बातमी डबल पेस्ट झाली होती. मी डीलिट केेली आहे, तरीही कृपया बातमी पाहणे.)

Next

देशभरात १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने राज्यभरात तायरी सुरू झाली आहे. लस घेण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी कोविन २.० हे ॲप उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. मात्र, हे कोविन ॲप बंद असल्याने रविवारी सायंकाळपर्यंत एकाचीही नोंदणी होऊ शकली नाही, शिवाय ज्येष्ठांची लसीकरण मोहीम कशी राबवावी, याबाबत खुद्द आरोग्य यंत्रणाच संभ्रमात असल्याचे दिसून आले. ज्येष्ठांना कुठे लसीकरण करण्यात येईल, याबाबतही आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना निश्चित सांगता आले नाही. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यात ज्येष्ठांना लस मिळणारच हे अद्यापही निश्चित झाले नाही.

१३ केंद्रांची नावे सुचविली

ज्येष्ठांच्या कोविड लसीकरण मोहीमेसाठी जिल्ह्यातील १३ रुग्णालयांची नावे केंद्र म्हणून केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले होते. यापैकी ज्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत, अशाच रुग्णालयांना लसीकरण केंद्र म्हणून मान्यता दिली जाणार आहे. स्थानिक आरोग्य केंद्राला केंद्र निश्चित झाल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याचेही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

...तर १ मार्चला प्रायोगिक तत्त्वावर होईल लसीकरण

शनिवार, रविवार असे दोन दिवस कोविन ॲप बंद होते. त्यामुळे ज्येष्ठांना लसीसाठी नोंदणी करणे शक्य झाले नाही. हे ॲप सोमवारी सुरू झाल्यास प्रायोगिक तत्त्वावर काही ज्येष्ठांची नोंदणी करून त्यांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पुढील दोन ते तीन दिवसांनंतर जिल्ह्यातील ज्येष्ठांना लस देण्यास सुरुवात होऊ शकते. सध्या तरी योग्य नियोजनाअभावी आणि वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शक सूचना मिळाल्या नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे.

अशी करता येईल नोंदणी

कोविन २.० या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल.

एका मोबाइल क्रमांकावरून चौघांना नोंदणी करणे शक्य आहे.

४५ ते ५९ वर्षे वयोगटांतील व्यक्तींना आजार असेल, तर तसे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.

आधार कार्डची नोंदणी आवश्यक असेल.

वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शक सूचना मिळाल्या नाहीत. सोमवारी कोविन लिंक सुरू झाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर ज्येष्ठांची नोंदणी व लसीकरण मोहीम सुरू करू. जिल्ह्यातील समितीला लसीकरण केंद्रासाठी १३ रुग्णालयांची नावे पाठविण्यात आली होती. यापैकी केंद्र म्हणून मान्यता मिळालेल्या रुग्णालयात वरिष्ठांच्या सूचनेनुसार लसीकरण सुरू केले जाईल.

- डॉ.मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला

Web Title: The health system itself is confused about the vaccination of seniors (Tip - the news was double-pasted. I have deleted it, but please watch the news.)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.