आरोग्य चमू - ग्रामपंचायतींनी समन्वयातून लसीकरणाची गती वाढवावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:21+5:302021-07-08T04:14:21+5:30

अकोला : आरोग्य चमू व ग्रामपंचायतींनी समन्वय ठेवून लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ...

Health team - Gram Panchayats should speed up vaccination through coordination! | आरोग्य चमू - ग्रामपंचायतींनी समन्वयातून लसीकरणाची गती वाढवावी!

आरोग्य चमू - ग्रामपंचायतींनी समन्वयातून लसीकरणाची गती वाढवावी!

Next

अकोला : आरोग्य चमू व ग्रामपंचायतींनी समन्वय ठेवून लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी बुधवारी दिल्या.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी उगवा आणि घुसर येथील आरोग्य उपकेंद्रांमधील कोरोना लसीकरण सत्राला भेट देऊन पाहणी करीत आवश्यक त्या सूचना दिल्या.

लसीकरण मोहीम दीर्घकाळ सुरू राहणार असून, आरोग्य यंत्रणा सातत्याने काम करीत आहे. लसीकरण सत्राला मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची बाब विचारात घेता, गावनिहाय शिक्षकांना लसीकरण सत्राची जबाबदारी देण्याची संकल्पनाही कटियार यांनी यावेळी मांडली. ग्रामपंचायत, महसूल, शिक्षण तसेच इतर विभागांचे सहकार्य असल्यास लसीकरणाची गती वाढविली जाऊ शकते आणि जिल्हा लसीकरणात अव्वल राहू शकतो, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी सांगितले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन गावंडे, डॉ. खान, डॉ. पाटील, डॉ. हागे तसेच उगवा आणि घुसर येथील सरपंच उपस्थित होते. असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे माध्यम विस्तार अधिकारी प्रकाश गवळी यांनी कळविले.

Web Title: Health team - Gram Panchayats should speed up vaccination through coordination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.