लसीकरण नोंदणीसाठी आरोग्य कर्मचारी चढले पाण्याच्या टाकीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:15 AM2021-06-03T04:15:04+5:302021-06-03T04:15:04+5:30
अतिदुर्गम आदिवासीबहुल ग्राम सावरखेड येथे ९ जणांना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे २ जून रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय ...
अतिदुर्गम आदिवासीबहुल ग्राम सावरखेड येथे ९ जणांना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे २ जून रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. चिराग रेवाळे, डॉ. के. जे. डाखोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरखेड येथे कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केले होते. परंतु या ठिकाणी मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्यामुळे आरोग्य सेवक नितीन जाधव, संजय आडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून लाभार्थींची ऑनलाइन नोंदणी केली. एकूण ४६ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. शिबिराकरिता समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. योगेश नानवटे, आरोग्य सहायक श्रीमती इंगळे, आरोग्य सेविका सोनल शिरसाट, ग्रामसेविका श्रीमती खंडारे, अंगणवाडी सेविका अरुणा राऊत, आशा स्वयंसेविका सुमन देवकर, नलिनी देवकर व परिचर रेखा काळबाघ यांनी परिश्रम घेतले.
फोटो :
मोबइलला नेटवर्क नसल्यामुळे लसीकरण नोंदणी अडचणी.
पातूर तालुक्यात अनेक गावांमध्ये मोबाइलला नेटवर्क नाही, मात्र कोरोना अशा सर्वच दुर्गम गावांमध्ये पोहोचला असल्यामुळे लसीकरण करण्यासाठी गावात आरोग्य पथक पोहोचते. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मोबाइलसाठी नेटवर्क शोधावे लागते. कधी जंगलात, दुर्गमस्थळी आरोग्य कर्मचारी जातात. परंतु दुर्गम भागात मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोंदणी झाली नाही तर नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
===Photopath===
020621\img-20210602-wa0229.jpg
===Caption===
लसिकरणासाठी शोले स्टाईल आरोग्य कर्मचारी पाण्याच्या टाकीवर चढले