रस्त्यावर मातीचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:17 AM2021-02-07T04:17:50+5:302021-02-07T04:17:50+5:30
गोरक्षण राेडवर बाजार अकाेला : गाेरक्षण राेडवर माेठ्या प्रमाणात भाजीपाला व फळविक्री सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण ...
गोरक्षण राेडवर बाजार
अकाेला : गाेरक्षण राेडवर माेठ्या प्रमाणात भाजीपाला व फळविक्री सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत असून या विक्रेत्यांनी त्यांची दुकाने रस्त्याच्या कडेला लावताना वाहतुकीला अडथळा निर्माण हाेणार नाही अशी लावावीत, अशा सूचना त्यांना वाहतूक शाखा तसेच खदान पाेलिसांनी केल्या आहेत.
काैलखेड चाैकात अतिक्रमण वाढले
अकाेला : बार्शिटाकळी राेडवरील काैलखेड चाैकात माेठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने या परिसरातील अतिक्रमण काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पिंजर परिसरात अवैध धंदे वाढले
अकाेला : पिंजर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढल्याची माहिती आहे. त्यामुळे पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एकाच दिवसात चार ते पाच कारवाया करीत अवैध धंदेवाल्यांना सळाे की पळाे करून साेडले आहे. मात्र पाेलीस स्टेशनचे याकडे दुर्लक्ष आहे.
आकाेट फैलमध्ये दारूची अवैध विक्री
अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात अवैध दारूविक्री जाेरात सुरू आहे. याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष पथक तसेच शहर पाेलीस उपअधीक्षक यांच्या पथकाकडून या ठिकाणच्या दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
रस्त्यामुळे नागरिक हैराण
अकाेला : आकाेट फैल बापूनगर ते दम्मानी नेत्र हाॅस्पिटलपर्यंत रस्ता खाेदण्यात आला असून कच्चा माल यावर टाकण्यात आला आहे. या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे कामकाज तातडीने करावे यासाठी नगरसेविका चांदणी रवी शिंदे यांनी निवेदनही दिले आहे.
तडीपारीला स्थगिती
अकाेला : रामदासपेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दाेन आराेपींना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र या आदेशाला विभागीय आयुक्त यांनी स्थगिती दिल्याची माहिती आहे. दाेन आराेपींना पाेलीस अधीक्षकांनी तडीपार केले हाेते. या विराेधात आराेपींना विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेतली हाेती.
राेहित्र धाेकादायक
अकाेला : शहराच्या विविध भागात लावण्यात आलेले विजेचे राेहित्र उघड्यावर असल्याने ते धाेकादायक ठरत असल्याची चित्र आहे. राेहित्रापासून धाेका हाेऊ नये म्हणून संरक्षणासाठी पेटी लावण्यात आली हाेती. मात्र या पेट्यांची झाकणे चाेरीला गेल्याने हे राेहित्र पुन्हा उघडे झाले असून त्यापासून धाेका निर्माण झाला आहे.