अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची आज सुनावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 08:56 AM2020-09-28T08:56:03+5:302020-09-28T08:58:16+5:30

८५ ग्रामपंचायत सदस्यांची सोमवारी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.

Hearing of 85 Gram Panchayat members of Akola taluka today! | अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची आज सुनावणी!

अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची आज सुनावणी!

googlenewsNext

अकोला : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची सोमवारी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.
त्यामध्ये काही सरपंचचाही समावेश आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षाच्या कालावधीत संबंधित तहसीलदारांकडे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास संबधित सदस्य किंवा सरपंचांना अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०१७ मध्ये जिल्ह्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या; परंतु जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुषंगाने अकोला तालुक्यातील जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणाºया ८५ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी २८ सप्टेंबर रोजी अकोला उपविभागीय कार्यालयात घेण्यात येणार आहे. त्यामध्ये काही सारपंचांचादेखील समावेश आहे. सुनावणीनंतर संबंधित सदस्यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी सोमवारी घेण्यात येत आहे.
-डॉ. नीलेश अपार
उपविभागीय अधिकारी, अकोला.

Web Title: Hearing of 85 Gram Panchayat members of Akola taluka today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.