आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

By admin | Published: July 22, 2015 10:59 PM2015-07-22T22:59:13+5:302015-07-22T22:59:13+5:30

अकोला येथील शिक्षणसंस्थेतील लैंगिक शोषणप्रकरण.

Hearing on bail applications today | आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Next

अकोला - भारतीय सेवा सदनद्वारा संचालित अकोल्यातील एका महिला महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये काम करणार्‍या एका रोजंदारी युवकास कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याचा लैंगिक छळ करणारे संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रुंगटा यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोल्याच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला होता.

Web Title: Hearing on bail applications today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.