फुंडकर नामांकनप्रकरणी आज सुनावणी
By admin | Published: June 22, 2016 12:05 AM2016-06-22T00:05:41+5:302016-06-22T00:05:41+5:30
खामगाव अतिरिक्त सत्र न्यायालयात मंगळवारी होणा-या सुनावणीकडे राजकीय वर्तृळाचे लक्ष.
Next
खामगाव (जि. बुलडाणा) : विधान परिषद निवडणुकीचे नामांकन सादर करताना आमदार भाऊसाहेब फुंडकर यांनी न्यायप्रविष्ट प्रकरणाची माहिती दडविल्याबाबत दाखल प्रकरणात खामगाव अतिरिक्त सत्र न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीकरिता नामांकन सादर करताना भाऊसाहेब फ़ुंडकर यांनी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रामध्ये त्यांच्यावर न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांची माहिती दिली नाही, असा आरोप करीत फ़ुंडकरांवर कारवाई करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय वतरुळासह अनेकांचे लक्ष लागले आहे.