आदिवासी अप्पर आयुक्ताच्या जामिनावर सुनावणी
By admin | Published: October 8, 2014 01:06 AM2014-10-08T01:06:18+5:302014-10-08T01:06:18+5:30
जनरेटर खरेदी व्यवहारामध्ये ६७ लाख रुपयांचा अपहार.
अकोला: आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी केलेल्या जनरेटर खरेदी व्यवहारामध्ये ६७ लाख रुपयांचा अपहार करणारे एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त विश्वंभर वरवंटकर याच्या जामिनावर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली तर तत्कालीन प्रकल्प अधिकारी महेंद्रसिंग खोजरे याचा जामिन न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. धारणी, पांढरकवडा व अकोला येथील पोलिस ठाण्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीनुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अप्पर आयुक्त विश्वंभर वरवंटकर, अकोल्याचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी, महेंद्रसिंग खोजरे, जेएस एंटरप्राईजेसचा मालक शब्बीर अली मो. अलिम आणि तत्कालीन एसडीओ महसूल कोकलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला हो ता.