उष्णतेमुळे परिसरात वाढला सापांचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:16 AM2021-04-05T04:16:38+5:302021-04-05T04:16:38+5:30

-- नागरिकांकडून काेराेना नियमांची पायमल्ली अकाेला : काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी निर्बंध शिथिल केले असले, तरी अनेक काेराेना प्रतिबंधक ...

The heat increased the circulation of snakes in the area | उष्णतेमुळे परिसरात वाढला सापांचा संचार

उष्णतेमुळे परिसरात वाढला सापांचा संचार

Next

--

नागरिकांकडून काेराेना नियमांची पायमल्ली

अकाेला : काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी निर्बंध शिथिल केले असले, तरी अनेक काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन हाेताना दिसत नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेण्यासाठी, तसेच मास्क न वापरण्यासाठी दंड ठाेठावणाऱ्या पथकांची कमी संख्या अशा बेफिकीर नागरिकांच्या पथ्यावर पडत आहे.

---------------

लसीकरण सेंटरवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था हवी

अकाेला वाढते तापमान लक्षात घेता, कोविड लसीकरण सेंटरवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांनी एका निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासन, महापौर यांच्या केली आहे. ज्येष्ठ नागरिक लसीकरणाला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे व्हीलचेअर व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असे गवई यांचे म्हणणे आहे.

-------------------------

जिल्हा परिषदमध्ये खबरदारीच्या उपायांना हरताळ

अकाेला काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात शिस्त लावण्याची जबाबदारी असलेल्या जि.प.च्या मुख्यालयातच या सूचनांचे पालन हाेताना िदिसून येत नाही. जि.प.मध्ये उपाययाेजनांना हरताळ फासला गेल्याचे दिसून येते.

--------------------------

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चालक त्रस्त

अकाेला : फतेहल चाैक ते दामले चाैकापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते. सध्या उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने, अनेक जण या मार्गाचा वापर करतात. याच मार्गावर जुन्या दुचाकी, भंगारची दुकाने आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी हाेत आहे.

---------

बेशिस्त ऑटाे वाहतुकीत अडथळा

अकोला : जुने शहरातील जयहिंद चाैक परिसरात काही बेशिस्त ऑटाेरिक्षांमुळे वाहतुकीची काेंडी हाेते. भर चाैकात प्रवाशांसाठी अचानक रिक्षा थांबविण्यात येते. येथील पाेलीस चाैकीसमाेरच रस्त्यावर ऑटाे उभी करून प्रवासी भरणे आणी उतरविण्यात येतात. त्यामुळे अनेकदा वाहन चालकांमध्ये वादही हाेताे. त्यामुळे या समस्येवर ताेडगा काढण्याची मागणी हाेत आहे.

-------------------------------------

Web Title: The heat increased the circulation of snakes in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.