अकोला जिल्ह्यात ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:43 PM2019-05-03T13:43:59+5:302019-05-03T13:44:05+5:30
अकोला: विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूरच्या भारतीय हवामानशास्त्र केंद्राने दिला आहे.
अकोला: विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूरच्या भारतीय हवामानशास्त्र केंद्राने दिला आहे. उष्माघाताच्या अनुषंगाने योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले असून, मे महिन्यात सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभाग व उपसचिव राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील कालावधीत उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसच्यावर पोहोचलेला असून, त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत आहे. त्यानुसार उष्माघातापासून बचाव करण्याकरिता तातडीच्या उपाययोजना करणे अधिक गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अकोला जितेंद्र पापळकर हे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या विविध कलमांनुसार येणाऱ्या अधिक तापमानाच्या कालावधीत विशेषत: मे महिन्यात सर्व शासकीय अशासकीय, खासगी शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवावीत, असा आदेश निर्गमित करीत आहेत. यादरम्यान, शाळा व महाविद्यालयाच्या परीक्षेच्या नियोजनावर परिणाम होणार नाही, यांची दक्षता घ्यावी. अतिरिक्त वर्ग किंवा शालेय परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात सकाळी ११ वाजतापर्यंत शाळा विद्यालये, महाविद्यालये सुरू राहतील, याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद अकोला, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका अकोला व सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी खासगी विशेषकरून सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा व महाविद्यालये मे महिन्यात बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात येत आहे, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्या आहेत.