विदर्भात चार एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:47 PM2019-04-01T13:47:37+5:302019-04-01T13:47:44+5:30
अकोला: सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, विदर्भातील प्रमुख शहरांमध्ये तापमान ४३ अंशांवर गेले असताना अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उष्णता वाढण्यास सुरुवात झाली असून, सूर्याने अक्षरश: आग ओकण्यास प्रारंभ केला आहे. उष्ण व कोरड्या हवामानामुळेविदर्भातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये तापमान वाढले आहे. अशातच ३१ मार्च ते ४ एप्रिल या काळात विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात वातावरण कोरडे राहील व कमाल तापमानात वाढ होईल. रविवारी विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यात ४२.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आगामी चार दिवसांत तापमान ४४ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.