बार्शीटाकळी तालुक्यात मुसळधार पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:49+5:302021-06-11T04:13:49+5:30
तालुक्यातील धामनदरी, चोहोगाव, सायखेड, मांडोली, मुंगसाजी नगर, खडकी, जांबवसू, कोथळी, साखरवीरा, जांभरून, हलदोली, वरखेड, देवदरी, किंनखेड, धानोरा, फेटरा, धोतरखेड, ...
तालुक्यातील धामनदरी, चोहोगाव, सायखेड, मांडोली, मुंगसाजी नगर, खडकी, जांबवसू, कोथळी, साखरवीरा, जांभरून, हलदोली, वरखेड, देवदरी, किंनखेड, धानोरा, फेटरा, धोतरखेड, धाबा, लोहगड, जनुना, निंबी, चेलका, राजनखेड, शेलगाव, बोरमळी, आदी गावांमध्ये या मुसळधार पावसाचा वेग जास्त होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतातील मशागतीची कामे सुरू असताना शेतशिवारात ट्रॅक्टर पावसामुळे अडकले. मृग नक्षत्रातील गुरुवारी झालेला पाऊस हा दमदार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता कपाशी लागवडीसह पेरणीची तयारी सुरू केली आहे.
फोटो :
पुरात गाय वाहून गेली!
चोहोगाव व सायखेडच्या मध्यभागी असलेल्या विद्रुपा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात गाय वाहून गेल्याची घटना घडली. नदीवर पूर पाहण्यासाठी आलेल्या युवकांनी नदीकाठी गाईला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, नदी ओलांडत असताना पुराच्या पाण्याने गायीला ओढले.