रुईखेड परिसरात गारांसह वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:52 AM2021-02-20T04:52:10+5:302021-02-20T04:52:10+5:30
यावर्षी अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी पुन्हा उभारी घेण्याकिरता बागायती क्षेत्रात गहू, हरभरा, कांदा पिकाची पेरणी केली आहे. ...
यावर्षी अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी पुन्हा उभारी घेण्याकिरता बागायती क्षेत्रात गहू, हरभरा, कांदा पिकाची पेरणी केली आहे. गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू जमीनदोस्त झाल्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. तसेच हातातोंडाशी आलेल्या हरभऱ्याचे पीक सोंगणीला आलेल्या हरभऱ्याचे गाठे गळून पडली आहेत. रुईखेड परिसरात केळी व संत्रा उत्पादक शेतकरी बऱ्याच प्रमाणत आहेत. गारपिटीमुळे केळीची पाने फाटल्यामुळे केळीचे उत्पादनदेखील घटणार असून, संत्रा बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी आलेल्या गारांसह वादळी पावसामुळे परिसरात महागाव, वस्तापूर मानकरी, चिचपाणी, बोरी, कोहा, कुंड, मार्डी, खिरकुंड, डांगरखेड इत्यादी गावातील शेतकऱ्यांचे बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचा त्वरित सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
फोटो