म्हातोडी परिसरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:53+5:302021-09-08T04:24:53+5:30
-------------------------- पूर्णेच्या पुराने बोरगाव वैराळे येथील नदीकाठची जमीन पाण्याखाली! बोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथील शेकडो ...
--------------------------
पूर्णेच्या पुराने बोरगाव वैराळे येथील नदीकाठची जमीन पाण्याखाली!
बोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथील शेकडो एक्कर जमिनीवरील खरिपाची पिके पूर्णेच्या पुराच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्याचे मुंग,उदीड, सोयाबीन, ज्वारी, कपाशी,तुर या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बोरगाव वैराळे, सोनाळा, अंदुरा परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहेत. बोरगाव वैराळे परिसरात येणाऱ्या अंदुरा, सोनाळा परिसरात जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
----------------------------------------------
रौंदळा येथे घरात शिरले पाणी
रौंदळा : येथे मंगळवारी मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. अकोट-शेगाव रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम न केल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. घरात पाणी शिरल्याने घरातील अन्न धान्य, घरगुती उपयोगी साहित्य भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.