मूर्तिजापुर तालुक्यात कोसळधारा; नदी- नाल्यांना पुर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 05:28 PM2021-09-07T17:28:32+5:302021-09-07T17:31:46+5:30
Heavy rain in Murtijapur taluka; पेढी, पुर्णा, कमळगंगा, उमा आणि काटेपूर्णा नदीसह- नाल्यांना प्रचंड पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.
-संजय उमक
मूर्तिजापूर : ६ व ७ सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली दरम्यान नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे तर पुरामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत.
तालुक्यातील पेढी, पुर्णा, कमळगंगा, उमा आणि काटेपूर्णा नदीसह- नाल्यांना प्रचंड पुर आल्याने
अनेक गावांचा संपर्क तुटला.
मुर्तिजापुर तालुक्यातील ऐंडली, पिंगला, झिंगला, खापरवाडा, लोनसणा, ताकवाडा, सोनोरी, बपोरी, गुंजवाडा, दातवी, गोरेगाव, समशेरपूर, गाजीपुर दताळा, भटोरी, मंगरुळ कांबे, या परिसरातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली आली तर यातील काही पिके खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोळासणाच्या दुपारपासूनच संपुर्ण तालुक्यात पावसाने जोरदार ऐंट्री केली, एकंदरीत संपूर्ण पावसाळ्यातील हा दमदार पाउस झाल्याचे बोलल्या जाते या पावसामुळे नदी काठावरील संपूर्ण गावात पुराचे पाणी शिरल्याने गावातील घरांनांही त्याची झळ सोसावी लागली. या पावसाने पिकांना जिवनदान मिळाले असले तरी शेकडो हेक्टर वरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तालुक्यात बहुतांश भागात यावर्षी पावसाच्या लहरीपणाचे दृश्य पहायला मिळाले. सुरुवातीला चांगला पाऊस होईल अशी आशा असतांना मात्र पावसाच्या अनियमीततेमुळे शेतकऱ्याच्या अपेक्षाभंग झाला. परिणामी शेतकऱ्यांची पेरणी व्यवस्था यावर्षी प्रभावीत होऊन तीन ते चार टप्प्यामध्ये पेरणी पुर्ण झाली आहे. असे असतांना मात्र पोळा सणाच्या मध्यरात्री जोरदार पावसाचे आगमन झाल्याने प्रातिक्षेत असणाऱ्या पिकांना जीवनदान मिळालंय. तालुक्यातील काही भागात जोरदार तर काही गावात अति जोरदार पाऊस बरसला आहे. अशातच अनेक गावात घरात पाणी शिरलय. शेलुबाजार, लोणसना, पिंगला, झिंगला, सोनोरी, बपोरी ही गावे पेढी, अंबाडा, पुर्णा या तीन नद्यांच्या संगमाचे वसलय असल्याने या नद्यांना पहाटेच्या सुमारास प्रचंड पुर आल्याने तालुक्यातील ४०० हेक्टरच्यावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर तसेच धामोरी, कार्ली, जामठी, आकोली या गावातील नदीकाठच्या शेतातील पिकांचं मोठ नुकसान झालंय. कार्ली आणि धामोरी या गावांचा तर पुरामुळे तब्बल १८ तास तर गोरेगाव येथील कोराडी नाल्याने आणि जितापूर खेडकर येथील नाल्याने नागरीकांची अनेकतास वाट अडवून ठेवल्याने मूर्तिजापूर शहराशी या गावांचा संपर्क तुटला होता.ल्यामुळे अनेकांना पुर ओसरण्याची प्रतिक्षा लागली होती. अनेक दिवसापासुन तालुक्यातील पिकांना पावसााची असणारी पावसाची प्रतिक्षा तुर्तास मिटली असली तरी या वर्षीच्या पावसाळ्या मधला हा सर्वाधीक पाउस आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीच हा एक आशेचा किरण असतो पोळ्याच्या दिवशी आलेल्या पुरामुळे माझ्या सर्व जमिनीवरील पिके पातण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो रुपये शेतीवर खर्च करुन शेवटी हातात काहीच मिळाले नाही. झालेल्या संपूर्ण नुकसानीचा शासनाकडून मोबदला मिळावा.
-अतुल आंबेकर, शेतकरी शेलू बाजार
लाखपूरी मतदार संघात नदीकाठावरील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी व पुराच्या वेढ्यामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याने नागरीक गावात अडकून पडले आहेत. त्यांची तातडीने मदत व पर्यायी व्यवस्था करावी
-अप्पूदादा तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य