पातूर तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 07:44 PM2017-10-11T19:44:32+5:302017-10-11T19:44:51+5:30

शिर्ला :  शिर्लासह पातूर तालुक्यात ११ ऑक्टोबर रोजी सकाळी  ११ वाजतापासून सर्वदूर पाऊस पडत आहे. शेतातील ओहोळ  भरून वाहत आहेत. नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.

Heavy rain with thundershowers in Patur taluka | पातूर तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

पातूर तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

Next
ठळक मुद्देसकाळी ११ वाजतापासून पावसाला सुरूवातनदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला :  शिर्लासह पातूर तालुक्यात ११ ऑक्टोबर रोजी सकाळी  ११ वाजतापासून सर्वदूर पाऊस पडत आहे. शेतातील ओहोळ  भरून वाहत आहेत. नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
गत दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्व गावांमध्ये कमी-अधिक  प्रमाणात पाऊस पडला; मात्र बुधवारी सर्वत्र जोरदार पाऊस  पडला. तालुक्यातील सोंगणी सुरू असलेले सोयाबीन पाण्याने  भिजले असून, कापूस ओला झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे  नुकसान होत आहे. मात्र, तूर पिकासाठी पाऊस लाभदायक  आहे. ज्वारीचे कणीस भरले आहे. सोंगणीला ज्वारी आली  असता पाऊस आल्याने ज्वारी काळी पडणार आहे. पावसाळा  कोरडा गेला; मात्र आता चांगला पाऊस येत असल्याने  लोकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Heavy rain with thundershowers in Patur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.