वाडेगावात जोरदार पाऊस; पिकाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 08:16 PM2017-10-05T20:16:01+5:302017-10-05T20:16:23+5:30
वाडेगाव : वाडेगावत ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतांमधील पिकांची मोठय़ा प्रमाणावर नासाडी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव : वाडेगावत ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतांमधील पिकांची मोठय़ा प्रमाणावर नासाडी झाली.
काही शेतकरी सोयाबीन सोंगत असताना अचानक पाऊस पडल्यामुळे काही शेतकर्यांचे सोयाबीन ओले झाले. काहींनी ताडपत्रीने झाकून सोयाबीन ओले होण्यापासून वाचविले. यामध्ये काही शेतकर्यांनी सोयाबीन पीक सोंगले असून, नुकसान होण्याचे संकेत आहेत. हा पाऊस तुरीच्या पिकाला लाभदायक ठरणार आहे; परंतु या पावसामुळे ज्वारीच्या पिकाचे नुकसान होण्याचीच शक्यता जास्त असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हवामान खात्याने १४ ऑक्टोबरपर्यंत पाऊस येणार असल्याचा अंदाज सांगितला असल्याने आता वाडेगाव परिसरातील शेतकरी घाबरले आहेत. हाता-तोंडाशी आलेला पिकाचा घास हा पाऊस घेऊन जातो की काय, याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे.