आगर परिसरात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:14 AM2021-06-18T04:14:36+5:302021-06-18T04:14:36+5:30
पिंजर परिसरात पेरणीला गती निहिदा : मंगळवारपासून पिंजर परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. शेतकरी बी-बियाण्यांसाठी लगबग करीत असून, बहुतांश ...
पिंजर परिसरात पेरणीला गती
निहिदा : मंगळवारपासून पिंजर परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. शेतकरी बी-बियाण्यांसाठी लगबग करीत असून, बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीला जोरात सुरुवात केली आहे. पेरणी केल्यानंतर निश्चित पाऊस पडणार आहे. या विश्वासाने शेतकरी जोमाने पेरणी करीत असल्याचे भेंडी सूत्रकचे शेतकरी नंदू गिलबिले यांनी सांगितले.
कोविड योद्धा म्हणून बाबन राठोड यांचा सत्कार
मूर्तिजापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यक्रमात कोरोना योद्धा म्हणून बालरोग तज्ज्ञ डॉ. बाबा राठोड यांचा अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. बाबन राठोड मागील अनेक वर्षांपासून मूर्तिजापूर शहरात बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत. यावेळी माजी आमदार भय्यासाहेब तिडके, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे उपस्थित होते.
कंझरा येथे लाभार्थ्यांना घरकुल प्रवेश
मूर्तिजापूर : ग्राम कंझरा येथे नुकताच ई गृहप्रवेश पंचायत समिती गटविकास अधिकारी बालासाहेब बायस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सरपंच अनिता चंद्रकांत टोम्पे, उपसरपंच निलेश गिरी, ग्रामसेवक संजय मोटघरे, सदस्य गायत्री काळेकर, लाभार्थी त्र्यंबकराव खोडके, तारा खोडके, निखिल टोम्पे, जितेंद्र नागोलकर, सुरेश नागोलकर, वर्षा डोईफोडे, राजू जुनेकर, अरविंद पंधेकर, सोयल चाऊस, संदीप जामनिक उपस्थित होते.
टायगर ग्रुपच्यावतीने धान्य वाटप
मूर्तिजापूर : टायगर ग्रुपतर्फे मंगळवारी गरजूंना धान्याचे वाटप करण्यात आले. अमरावती जिल्हा अध्यक्ष राम पाटील यांच्या मार्गदर्शनात गरजू लोकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी मनोज वानखडे, आदित्य भुईकर, उदय देशमुख, सागर बनसोड, ओमप्रकाश शिंदे, आदित्य वर्घट, ऋषीकेश बनसोड, रंजीत भुईकर, कार्तिक धानोरकर, लकी चौहान, सौरभ खाडे, ऋषी गावंडे, निखिल कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो: