अतिवृष्टी:पिकांचे सर्व्हे करून आर्थिक मदत देण्याची मागणी! मासा, सिसा, उदेगाव डोगंरगाव ग्रा.पं.चे तहसीलदाराना निवेदन
By रवी दामोदर | Published: September 14, 2022 04:29 PM2022-09-14T16:29:07+5:302022-09-14T16:29:43+5:30
Akola News: अकोला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील मासा, सिसा उदेगांव,डोगंरगाव बाभुळगांव या शिवारामधील खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- रवी दामोदर
अकोला - अकोला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील मासा, सिसा उदेगांव,डोगंरगाव बाभुळगांव या शिवारामधील खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करीत ग्रामपंचायतने तहसीलदारांना बुधवारी निवेदन दिले आहे.
तसेच नदी काठचा सव्हें या आधी झाला असून, त्यांना मदत पण मिळणार पण हे शेतकरी नदी काठी नाहीत त्या शेतकन्यांच्या पिकाचे सुध्दा मोठया प्रमाणात नुकसार झाले आहे. सोयाबीन, कापुस, तुर व भाजीपाले या पिकांना मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी शर्व करून पिके मोठे केली आहेत. माहे जुन-जुलै महिण्या मध्ये सुध्दा या शेतकन्यांच्या शेतात मुसळधार पाउस पडला त्यावेळी कृषी सहायक, तलाठी यांना सांगून त्यांनी सर्व्हे केला नाही. कारण त्यांनी नदी काठचा सर्व्हे आहे असे सांगून सर्व्हे केला नाही.
आम्ही ग्राम पंचायत डोंगरगांव तसेच डोंगरगांव मासा, सिसा, उदेगांव बाभुळगांव येथील शेतकरी आपणांस विनंती करतात की, अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानामुळे आमच्या शेतातील सर्व्हे करून आम्हाला लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मासा सिसाउदेगाव सरपंच इंदिराताई फाले, डोगंरगाव येथिल सरपंच रुपाली नागापुरे, उपसरपंच किशोर काकडे व सतिश फाले, किशोर काकडे, योगेश नागापुरे, प्रमेश फाले, प्रशांत फाले, संदिप फाले, संदिप दहातोंडे, अनिकेत फाले, गजानन फाले, नितीन फाले, विष्णू फाले, राहुल दहातोंडे, अकुंश फाले, चेतन ऊगले, शुभम फाले, उत्तम काकडे आदी उपस्थित होते.