मुसळधार पावसाचा महावितरणला फटका, शेकडो विद्युत खांब पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 11:15 AM2021-07-24T11:15:55+5:302021-07-24T11:16:03+5:30

Heavy rains hit MSEDCL : पाचशेवर वीज खांबाचे व त्यावरिल वीज वाहिन्यांचे नुकसाने झाल्याने अनेक गावे अंधारात गेली होती.

Heavy rains hit MSEDCL, leaving many villages in darkness | मुसळधार पावसाचा महावितरणला फटका, शेकडो विद्युत खांब पडले

मुसळधार पावसाचा महावितरणला फटका, शेकडो विद्युत खांब पडले

Next

अकोला : जिल्ह्यात बुधवार २१ जुलै रोजी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा जोरदार फटका जिल्ह्यातील महावितरणला बसला आहे.पाचशेवर वीज खांबाचे व त्यावरिल वीज वाहिन्यांचे नुकसाने झाल्याने अनेक गावे अंधारात गेली होती. महावितरणच्या बिकट परिस्थितीतही होत असलेल्या युध्दस्तरावरील प्रयत्नाने बऱ्याच गावाचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात यश आले आहे. परंतू काही गावे अजूनही संपर्काबाहेरच असल्याने अंधारातच आहे. शिवाय तेथील नुकसानाची परिस्थिती अद्याप महावितरणला कळली नसल्याने मोर्णा नदिची पुरस्थिती कमी होताच बाकी गांवाचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येणार असल्याने या काळात ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

विदर्भासह राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोर्णा व पुर्णा नदिकाठची गावे पाण्यात गेली आहे. पुराचा वेग एवढा प्रंचड होता की,या पुरात मोर्णा नदिच्या काठालगतचे १५ उच्च दाब वाहिनीचे तर २ लघूदाब वाहिनीचे वीज खांब आणि त्यावरिल वीज वाहिनी वाहून गेली आहे. उच्च व लघूदाब वाहिनीचे १७५ वीज खांब जमीनदोस्त झाले आहे. ६१ वीज खांब तुटले आहे ,तर २८१ वीज खांब जमिनीलगत झुकले आहे. याचबरोबर १० वितरण रोहित्रेही पडले असल्याने मोर्णा आणि पुर्णा नदि परिसरातील २४ गावे ही अंधारात गेली होती.

 

या गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत

अशा परिस्थितीतही महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यासह,कंत्राटदारांच्या मदतीने युध्दस्तरावर कामाला सुरूवात केली.सर्वत्र चिखल,पाणी असल्याने वीज खांब,वीज वाहिन्या वाहून नेणे आणि अशा दलदलित वीज यंत्रणेची उभारणी करणे अशक्यप्राय कामे करण्यात आली. परिणामी निंबी,म्हैसपुर,रिधोरा,सुकोडा,पाचमोरी,न्यु सुकोडा,जुना सुकोडा ,अमानतपुर,ताकोडा,जलम,टाकळी,वाकापूर, गडंकी गावाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.

ही गावे अंधारातच

लोणी,भोड,सांगवी,मोहाडी,कानडी,वाखी,आखतवाडा,आगर,लोणाग्रा,दुधाळा,मांडला,कांचनपुर,बदलापूर,नवथळ आणि खेकडी या गावाचा वीज पुरवठा खंडित आहे. वीज पुरवठा बंद असलेली सर्व गावे ही उगवा वाहिनीवर असल्याने या वाहिनीचे वीज खांब मोर्णा नदिच्या पुरात वाहून गेले आहे. शिवाय मोर्णा व पुर्णा नदिच्या पुरस्थितीमुळे या गावांना जोडणारे रस्ते बंद असल्याने संपर्क होणे कठिण झाले आहे.पुरस्थिती ओसरताच या गावाचाही वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या मार्गदर्शनत आणि उपकार्यकारी अभियंता सारंगधर केनेकर यांच्या नेतृत्वात आणि अभियंते अजय भोकरे, हेमलता पाटील ,तायडे, दिपक देशमुख, प्रविण बदुकाले, सचिन कळूसे यांच्यासह जनमित्र श्रीशिव निंबेकर, प्रशांत शेळके,जितू गवई, शुभम मोहोड, आमटे, भागवत, अभय भारसाकळे , संजय कागणे,सोळंके,वाघोलीकर,तायडे, विजय केने आदी कार्यरत आहेत.

Web Title: Heavy rains hit MSEDCL, leaving many villages in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.