मूर्तिजापुरात जोरदार पाऊस; बाजार समितील शेतकऱ्यांचा माल भिजला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 AM2021-05-29T04:16:04+5:302021-05-29T04:16:04+5:30
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गत पंधरा दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धान्य खरेदी बंद ठेवण्यात आली होती, सोमवारपासून धान्य खरेदी ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गत पंधरा दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धान्य खरेदी बंद ठेवण्यात आली होती, सोमवारपासून धान्य खरेदी पूर्ववत करण्यात आल्याने धान्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे हरभरा, गहू, सोयाबीन धान्य लिलावासाठी मैदानावर तसेच पडून होते. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक मान्सूनपूर्व पावसाच्या अर्धातास जोरदार सरी कोसळल्याने मैदानावर व शेडमध्ये असलेले शेतकऱ्यांचे धान्य मोठ्या प्रमाणात भिजल्याने आर्थिक फटका बसला आहे. (फोटो)
--------------------
मास्क बांधण्यावरून वाद
कोरोना धास्तीने गत पंधरा दिवस धान्य खरेदी बंद ठेवण्यात आली होती. बाजार समितीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु धान्य विक्रीसाठी आणलेल्या एका शेतकऱ्याने मास्क न लावता संपूर्ण बाजार समितीत मुक्त संचार केला. याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांनी सदर शेतकऱ्याला मास्क लावण्याची विनंती केली असता शेतकरी चिडून कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने वाद झाला होता.
------------------
धान्य लिलाव दोन वाजताच संपला व पाऊस पाच वाजता आला त्यामुळे यात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान कमी झाले. खरीददारांच्या चुकीमुळे माल भिजला.
-रितेश मडगे, सचिव, कृषी उत्पादन बाजार समिती, मूर्तिजापूर.