मद्यधुंद तरुणींचा महामार्गावर हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:46 AM2017-08-05T01:46:58+5:302017-08-05T01:50:21+5:30

अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील निमवाडी पुलावर चार तरुणींनी खुलेआम बिअर ढोसल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. वर्दळीच्या या रोडवर हाताता बॉटल घेऊन बिअर पित असताना या तरुणींनी हैदोस घालत प्रचंड धुमाकूळ सुरू केला होता; मात्र सायंकाळी या बेभाण तरुणींची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी बिअर पिणार्‍या चारही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांना सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.

Hedos on the highway of drunken women | मद्यधुंद तरुणींचा महामार्गावर हैदोस

मद्यधुंद तरुणींचा महामार्गावर हैदोस

Next
ठळक मुद्देचार तरुणी पोलिसांच्या ताब्याततरुणींनी खुलेआम ढोसल्या बिअर राष्ट्रीय महामार्गावरील निमवाडी पुलावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील निमवाडी पुलावर चार तरुणींनी खुलेआम बिअर ढोसल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. वर्दळीच्या या रोडवर हाताता बॉटल घेऊन बिअर पित असताना या तरुणींनी हैदोस घालत प्रचंड धुमाकूळ सुरू केला होता; मात्र सायंकाळी या बेभाण तरुणींची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी बिअर पिणार्‍या चारही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांना सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.
नेहरू पार्क चौक ते वाशिम बायपास या परिसरात राष्ट्रीय महामार्गावर चार तरु णी गत काही महिन्यांपासून दुचाकी घेऊन फिरत आहेत. या तरुणींचे सौंदर्य आणि राहणीमान लक्षात घेता अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळतात. रोजच राष्ट्रीय महामार्गावर फिरणार्‍या या तरुणींसोबत काही तरुणही असतात; मात्र या तरुणींना काही म्हटल्यास वादाचा विषय होऊ शकतोम्हणून आजपर्यंत त्यांना कुणी हटकले नाही; मात्र या चारही तरुणींनी शुक्रवारी परिसीमा गाठली अन् हातात बिअरच्या बॉटल घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील निमवाडी पूल आणि पोलीस मुख्यालयाच्या भिंतीला लागून प्रचंड धुडगूस घातला. यथेच्छ मद्य प्राशन करून असलेल्या तरुणींना भान नसल्याने त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध येऊन बिअरच्या बॉटल हातात घेत बिअर प्राशन केली. हा प्रकार येणार्‍या-जाणार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर चारही मद्यधुंद तरुणींची माहिती सिटी कोतवाली पोलीस व दामिनी पथकाला दिली. या दोन्ही पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही मद्य प्राशन केलेल्या तरुणींना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस मुख्यालयामध्ये ठेवले; मात्र या ठिकाणीही त्यांनी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केल्याने दामिनी पथकाने त्यांना सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

Web Title: Hedos on the highway of drunken women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.