पत्रकारितेच्या विचारांची उंची अनुकरणीय
By admin | Published: January 7, 2017 02:29 AM2017-01-07T02:29:53+5:302017-01-07T02:29:53+5:30
सीईओ अरुण विधळे यांच्या हस्ते पत्रकार दिनी गुणवंत पत्रकारांचा सत्कार
अकोला, दि. 0६- पत्रकारिता करताना धावपळ आणि विविध क्षेत्रातील ज्ञान आवश्यक असते. वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीच्या बातम्यातून पत्रकारितेच्या विचारांची उंची झळकत असते, ती अनुकरणीय आहे. असे प्रतिपादन अकोला जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अरुण विधळे यांनी केले. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. निमवाडीस्थित पत्रकार भवनातील स्व. पन्नालाल शर्मा सांस्कृतिक सभागृहात गुणवंत पत्रकाराच्या स त्काराने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
पत्रकार दिन सोहळ्य़ाच्या मंचावर विधळेसह जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हाध्यक्ष शौकतअली मीरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजूरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, महेंद्र कविश्वर उपस्थित होते. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पणाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक सिद्धार्थ शर्मा यांनी केले. माहिती अधिकारी पाटील यांनी आचार्य जांभेकरांचा जीवनपट उलगडला.
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकतअली मीरसाहेब यांनी पत्रकार संघाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे पदाधिकारी रामदास वानखडे, गजानन सोमाणी, कीर्तीकुमार वर्मा, विजय शिंदे, संदीप पांडव, मुकुंद देशमुख, विनायक पांडे, डॉ. अतिकुर रहेमान, अजय जहागिरदार, सुरेश नागापुरे, मिलिंद गायकवाड, धनंजय साबळे, उमेश देशमुख, राजू उखळकर, संजय अलाट, कमल शर्मा, दिलीप ब्राह्मणे, अकबर खान, विठ्ठल देशमुख, जीवन सोनटक्के, अनुप ताले, प्रा. मोहन खडसे, सत्यशील सावरकर, अँड. शरद गांधी, प्रकाश भंडारी, विलास देशमुख, रामविलास शुक्ल, अनंत वानखडे, सुरेश राठोड, गणेश देशमुख, लक्ष्मण हागे, हबीब शेख, नंदू सोपले, श्रीकांत जोगळेकर आदी प्रामु ख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद लाजुरकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय खांडेकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून यावेळी जिल्हय़ातील गुणवंत पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार रामदास उगले, केशवराव लुले, विनायक काजळे, पुरस्कार प्राप्त सचिन राऊत, प्रा. अविनाश बेलाडकर, वृत्तपत्र छायाचित्र पत्रकार प्रवीण ठाकरे, नीरज भांगे, चंद्रकांत पाटील यांचा शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.