शिवजयंतीनिमीत्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 06:42 PM2019-03-18T18:42:16+5:302019-03-18T18:42:22+5:30

अकोला: महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमीत्त येत्या २३ मार्च रोजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे.

 Help for families of suicide victims on the ocasion of Shiv Jayanti | शिवजयंतीनिमीत्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

शिवजयंतीनिमीत्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

googlenewsNext

अकोला: महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमीत्त येत्या २३ मार्च रोजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे. रौप्यमहोत्सवी शिवजयंती सोहळ््याला विशेष निमंत्रित म्हणून प.पु.आचार्य श्रीनाथपिठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांची उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबांना मदत केली जाईल. यावेळी रेणूका नगरस्थित जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात भव्यदिव्य असा शिवनेरी किल्ला साकारण्यात आल्याची माहिती उपमहापौर वैशाली शेळके यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जुने शहरातील डाबकी रोड परिसरात मागील २४ वर्षांपासून जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठाणच्यावतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा २३ मार्च शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त रेणूका नगरमध्ये भव्य शिवनेरी किल्ला उभारण्यात आला असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमहापौर वैशाली शेळके यांनी यावेळी दिली. यंदा कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील देवनाथमठाचे प.पु.आचार्य श्रीनाथपिठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांची उपस्थित लाभणार आहे. यासोबतच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत सामाजिक क्षेत्रा तील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्याचे उपमहापौर शेळके यांनी सांगितले. २३ मार्च रोजी जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी ५ ते ६ या वेळेत शिवरायांचे मुतीर्पुजन केले जाणार असून ६ ते ७ यादरम्यान शेतकरी कुटुंबियांना विविध स्वरूपात मदत दिली जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता शिवरायांच्या मिरवणुकीला प्रारंभ होऊन डाबकी रोड मार्गे कस्तुरबा गांधी
रूग्णालयामागील श्री संत गाडगे बाबा व्यायाम शाळा तथा आखाडा येथे रात्री १० वाजता मिरवणुकीचा समारोप होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी यावेळी दिली. शिवरायांचा आदर्श डोळ््यासमोर ठेऊन या कार्यक्रमात समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला जाणार असून शिवरायांचा नेत्रदिपक सोहळा पाहण्यासाठी समस्त अकोलकरांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना शहर प्रमुख अतूल पवनिकर, राष्ट्रवादीचे मा.नगरसेवक मनोज गायकवाड, जय बाभळेश्वर सामाजिक प्र ितष्ठाणचे अध्यक्ष राजेश शाहू यांनी केले. पत्रकार परिषदेला भाजप नगरसेवक सुनील क्षिरसागर, अनिल गरड, सतिष ढगे, तुषार भिरड, नगरसेविका रंजना विंचनकर, नंदाताई पाटील, मा.नगसेविका मंगला म्हैसने, डाबकी रोडवासी कावडचे पदाधिकारी संदीप पवार, काँग्रेसचे पदाधिकारी विलास गोतमारे, शाम विंचनकर आदी उपस्थित होते.

Web Title:  Help for families of suicide victims on the ocasion of Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.