‘अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:25 AM2021-08-18T04:25:33+5:302021-08-18T04:25:33+5:30

अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन अकोला: भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त भाजप कार्यालयात अभिवादन करण्यात आले. ...

‘Help the flood victims immediately!’ | ‘अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या!’

‘अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या!’

Next

अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

अकोला: भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त भाजप कार्यालयात अभिवादन करण्यात आले. वाजपेयी यांनी संपूर्ण जीवन पक्षासाठी वाहून घेतल्याचे विचार व्यक्त करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आ.रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, मनीराम टाले, शिवकुमार शर्मा, माधव मानकर, अतुल जुमडे, दीपक काळे, गणेश सांगाव, विनोद सुरोसे, राजू लाखे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पाकिस्तानच्या ‘त्या’ कृत्याचा निषेध

अकाेला: पाकिस्तानातील लाहाेर येथे महाराजा रणजीत सिंग यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी मंगळवारी श्रीराम नवमी शाेभायात्रा समितीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या प्रकरणी केंद्र शासनाने पाकिस्तान सरकारकडे कडक शब्दांत निषेध व्यक्त करावा, तसेच सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी पाकिस्तान उच्च आयुक्ताकडे निवेदन पाठविण्याचे आवाहन आ.गोवर्धन शर्मा, समितीचे अध्यक्ष विलास अनासने यांनी केले आहे.

‘मनपात सफाई कर्मचारी पदे भरा !’

अकाेला: मनपात आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ७४७ आहे. शहराची लाेकसंख्या सात लाखांच्या आसपास असून, प्रत्यक्षात सफाईची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ५००च्या घरात आहे. निकषानुसार ही संख्या अतिशय ताेकडी असून, साफसफाईची कामे निकाली काढण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याची मागणी प्रशासनाकडे मीनाबाई काळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

डाबकी राेडवर तुंबले पावसाचे पाणी

अकाेला: शहरात मंगळवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे अकाेलेकरांची दाणादाण उडाली. जुने शहरात डाबकी राेडवरील गाेळे यांचे स्वस्त धान्य दुकान, सरस्वती सुपर शाॅपी, तसेच मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या समाेर पावसाचे पाणी तुंबले. रस्त्यालगतच्या दाेन्ही कडेच्या नाल्या बुजल्याने पाण्याचा निचरा हाेत नसल्याने वाहनधारकांची कुचंबणा हाेत आहे.

Web Title: ‘Help the flood victims immediately!’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.