नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:18+5:302021-07-23T04:13:18+5:30
दरम्यान सायंकाळी जिल्हाधिकारी निमा अरोरा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. त्याअनुषंगाने आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ...
दरम्यान सायंकाळी जिल्हाधिकारी निमा अरोरा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. त्याअनुषंगाने आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नुकसानीच्या मुद्द्यावर चर्चा केली. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात शेती पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शहरातील १२९ नाल्यांची सफाई;
पंपिंग मशीन उपलब्ध करा!
अकोला शहरातील १२९ नाल्यांची सफाई करण्याची कामे महानगरपालिकामार्फत तातडीने करण्यात यावी, तसेच पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात पंपिंग मशीन उपलब्ध करून देण्यात यावी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य मनपाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे यावेळी भाजपच्यावतीने करण्यात आली.