वृद्धाश्रमाला मदत करणारे हात आले पुढे ; मदतीचा ओघ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:45+5:302021-04-20T04:19:45+5:30
मूर्तिजापूर : येथील महात्मा फुले वृध्दाश्रमातील वृध्दांची भेट घेऊन 'लोकमत' ने त्यांच्या भावना जाणून घेऊन 'भेटीगाठीसह मदतही आटली. वृद्धाश्रमात ...
मूर्तिजापूर : येथील महात्मा फुले वृध्दाश्रमातील वृध्दांची भेट घेऊन 'लोकमत' ने त्यांच्या भावना जाणून घेऊन 'भेटीगाठीसह मदतही आटली. वृद्धाश्रमात आजी- आजोबा एकाकी' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच समाजमन जागरूक झाले असून वृध्दाश्रमाला मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
१८ एप्रिल रोजी सदर वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील वृध्दांच्या भावना जाणून घेऊन १९ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित करताच, संवेदनशील समाजमन जागरूक होऊन वृध्दाश्रमाला मदतीसाठी वृत्त वाचून सकाळपासूनच अनेक नागरिकांनी लोकमत प्रतिनिधीला फोन करुन विचारणा केली. त्या अनुषंगाने पहिल्याच दिवशी मदतीचे हात पुढे आले असून अनेकांनी धान्य, किराणासह विविध स्वरूपात आपल्या परीने मदत देण्याचा प्रयत्न केला. आणखी अशा स्वरुपाची मदत पोहोचविण्याचा मानस अनेकांनी लोकमतजवळ व्यक्त केला आहे. त्यांची मुले नातेवाईक जवळ करत नसले तरी आम्ही त्यांची मुले म्हणून सदैव मदत करत राहू अशा भावनाही अनेकांनी मदत देताना व्यक्त केल्या.
फोटो:
जन्मदात्या वृद्ध आईवडिलांची अशा सुशिक्षित व्यक्तींकडून उतारवयात हेळसांड होत असेल तर ही खेदाची बाब आहे. संस्कार आणि संस्कृती लोप पावत आहे. जीवनात आधी मायबाप येतात. नंतर इतर सर्वकाही. प्रत्येकाला या प्रसंगातून जावेच लागते. म्हातारपणात आईवडिलांची काळजी घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
- शरद वि. तांबडे, मुख्याध्यापक जि.प. शाळा, नागोली