काेराेना काळात पुढे येतात मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:59+5:302021-05-10T04:17:59+5:30

अकोला : काेराेना काळात मदतीचे शेकडाे हात समाेर येत आहेत. त्यामध्ये अकाेल्यातील फ्लाइंग कलर्स एज्युकेशन फाउंडेशन ही एक ...

Helping hands come forward during Kareena | काेराेना काळात पुढे येतात मदतीचे हात

काेराेना काळात पुढे येतात मदतीचे हात

Next

अकोला : काेराेना काळात मदतीचे शेकडाे हात समाेर येत आहेत. त्यामध्ये अकाेल्यातील फ्लाइंग कलर्स एज्युकेशन फाउंडेशन ही एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून रोटी बँक, कपडा बँक, मेडिकल साहाय्यता केंद्राचा उपक्रम राबविले जात असून शेकडाे लाेकांना दिलासा मिळाला आहे.

रोटी बँक दवाखाने व गरीब लोकांच्या वस्तीमध्ये खाण्यापिण्याचे आणि रेशनचे वितरण करत आहे. दुसरीकडे कपडा बँकेमधून गरजू व्यक्ती आणि मुलांमध्ये कपडे आणि चपलालदेखील वितरित करत आहेत. दुसरीकडे पीडित रुग्णांना मेडिकल साहाय्यता केंद्र येथून साहाय्यता नि:शुल्क देत आहेत.

लॉकडाऊनमधील रोजगार गमावलेल्या लोकांना फाउंडेशनच्या एका रोजगाराच्या मोहिमेतून ज्यामध्ये हातगाड्या, शिलाई मशीन, सायकल रिक्षा किंवा कोणत्याही सामानाची गरज असल्यास त्यांना दिली जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जुबेर नदीम यांनी सांगितले. गेल्या वर्षात सुमारे २ लाख व्यक्तींना जेवण पोहोचवले आहे, तर १,१०० कुटुंबात रेशन किट्सचे तसेच या वर्षी रमजानमध्ये ६०० कुटुंबीयांना रेशन किट्स पोहोचवले असल्याचेही जुबेर म्हणाले.

अशाच प्रकारे कपडा बँकेने १,००० अधिक कपडे आणि ४०० स्वेटर दिले आहेत. या कार्यात डॉ. मुजाहिद अहमद, रियाज खान, अब्दुल रहीम, रिजवान खान, राहील अफसर, सय्यद मोहसीन अली, समीर खान, उबेद शेख, रियाज अहमद, डॉ. सरोश खान, उबैदुल्लाह खान आणि आदिल अशर आदींचा सहभाग आहे.

Web Title: Helping hands come forward during Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.