मेळघाटातील आदिवासी बांधवांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:19+5:302021-09-23T04:21:19+5:30
मूर्तिजापूर : श्री गाडगे महाराज संस्था, श्री क्षेत्र नागरवाडी व श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था, मूर्तिजापूर यांच्यावतीने संचालक बापुसाहेब ...
मूर्तिजापूर : श्री गाडगे महाराज संस्था, श्री क्षेत्र नागरवाडी व श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था, मूर्तिजापूर यांच्यावतीने संचालक बापुसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात गाडगे बाबांच्या प्रतिरुप सेवार्थ प्रचार वाहनातून मेळघाटातील अतिदुर्गम भागातील गोरगरिबांना मदत देण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना जीवनावश्यक साहित्य, किराणा किट आदींचे वाटप करण्यात आले.
माळीझडप व नवलगाव या गावात जाण्यासाठी अद्याप २५ ते ३० कि. मी.पर्यंत रस्ता नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजुला घनदाट स्वरुपाचे जंगल असून, वन्य प्राण्यांचा वावर आहे. सद्यस्थितीत गरजू आदिवासी बांधवांना मदतीचा एक हात म्हणून संतोषकुमार झुनझुनवाला, सीतादेवी झुनझुनवाला यांच्या सौजन्याने धान्य किराणा किटसह कपडे, साड्या आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांना शिक्षण विस्तार अधिकारी ए. आ. वि. प्र. धारणीचे धर्माळे यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी ऋत्विक देशमुख, मनीष भुतडा यांनीही मदत केली. यावेळी सागरभाऊ देशमुख, प्रकाश महात्मे, हरिभाऊ मोगरकर, विठ्ठलराव तेलमोरे तसेच गाडगे महाराज आश्रमशाळा, नागरवाडी येथील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व श्री बाबांचे सेवक उपस्थित होते.