पंदेकृवि कुलगुरू निवडीसाठी हेमंत गोखले समिती गठित

By admin | Published: April 23, 2017 01:33 AM2017-04-23T01:33:54+5:302017-04-23T01:33:54+5:30

ऑगस्टमध्ये कुलगुरू दाणी यांचा कार्यकाळ संपणार!

Hemant Gokhale Committee constituted for selection of Pandevi VC | पंदेकृवि कुलगुरू निवडीसाठी हेमंत गोखले समिती गठित

पंदेकृवि कुलगुरू निवडीसाठी हेमंत गोखले समिती गठित

Next

अकोला: येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सेवानवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली आहे. समिती राज्यपालांच्या विचारार्थ कुलगुरू पदासाठी योग्य व्यक्तींच्या नावाची यादी सादर करणार आहे.
विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कार्यकाळ १३ ऑगस्ट २0१७ रोजी संपत असल्याच्या पृष्ठभूमीवर ही निवड समिती गठित करण्यात आली आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार समितीचे अन्य सदस्य असतील.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ येणार्‍या १३ ऑगस्टला संपणार आहे. या पृष्ठभूमीवर १४ व्या कुलगुरू पदाची प्रक्रिया पुढच्या मे महिन्यात सुरू होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, डॉ. दाणी यांचे प्रशासकीय व आर्थिक अधिकार गोठविण्यात आल्याचे पत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पाठविण्यात आले आहे. या आशयाचे वृत्त लोकमतने १८ एप्रिलला प्रसिद्ध केले होते.

Web Title: Hemant Gokhale Committee constituted for selection of Pandevi VC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.