नया अंदुरा शेतशिवारात रानडुकरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:07+5:302020-12-16T04:34:07+5:30
कारंजा रमजानपूर येथील अल्पभूधारक शेतकरी पांडुरंग विठ्ठल शेगोकार याच्या कारंजा शिवारातील गट क्रमांक ८६ व नया अंदुरा येथील अल्पभूधारक ...
कारंजा रमजानपूर येथील अल्पभूधारक शेतकरी पांडुरंग विठ्ठल शेगोकार याच्या कारंजा शिवारातील गट क्रमांक ८६ व नया अंदुरा येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीराम पुडंलीक झाडे गट नं २७२ कवठा शिवारातील दोन एकर शेततामधील रानडुकराने हैदोस करून दोन एकरमधील फूल व काटे अवस्थेत असताना रानडुकराने शेतकऱ्यांचे दोन एकरातील हरभरा भुईसपाट केल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान केले आहे. शेतकऱ्याने कर्ज काढून खते, बी-बियाणे आणून पेरणी केली असून, त्यामुळे श्रीराम झाडे व पांडुरंग शेगोकार यांच्या दोन एकरातील तलाठी व वनविभागने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस रानडुकरांची तसेच वन्यप्राण्यांच्या वाढत्या हैदोसाने वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. परंतु याबाबत वारंवार माहिती तसेच लेखीतक्रार करूनही वनविभागाकडून दखल घेतल्या जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. पेरणी व बियाणे यांच्या वाढत्या खर्चामुळे त्यांना आपल्या पिकांची रात्रभर राखणदारी करावी लागत आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पांडुरंग शेगोकार, श्रीराम झाडे, रामकृष्ण साबळे, विजय पातुर्डे, रमेश मांगुळकार, प्रमोद वानखडे तसेच नया अंदुरा व कारंजा रमजानपूर परिसरातील शेतकरी करीत आहेत.
फोटो:
पिकाच्या संरक्षणासाठी रात्री राखणदारी !
वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास शेतात जाऊन पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी रात्री स्वत:चा जीव धोक्यात टाकून जागरण करून पिकांचे रक्षण करीत आहेत. त्यामुळे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.