हिरो होंडा सर्व्हिस सेंटरला ग्राहक मंचाचा दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:56+5:302021-03-06T04:17:56+5:30

त्यामधे वाहन दुरुस्तीपोटी वाहनधारकाकडून घेतलेले २ हजार १५५ रुपये, शारिरीक, मानसिक त्रासापोटी एक हजार रुपये व तक्रार खर्चापोटी १ ...

Hero Honda Service Center hits customer forum! | हिरो होंडा सर्व्हिस सेंटरला ग्राहक मंचाचा दणका !

हिरो होंडा सर्व्हिस सेंटरला ग्राहक मंचाचा दणका !

Next

त्यामधे वाहन दुरुस्तीपोटी वाहनधारकाकडून घेतलेले २ हजार १५५ रुपये, शारिरीक, मानसिक त्रासापोटी एक हजार रुपये व तक्रार खर्चापोटी १ हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. वाहनात स्पेअरपार्ट न बदलविता बोगस बिले ग्राहकांकडून वसूल करणाऱ्यांना ग्राहक मंचाने चांगलीच चपराक लगावली आहे. पॉप्युलर हिरो होंडा सर्व्हिस सेंटर, दक्षतानगर संकुल अकोला येथे बाबाराव जानूजी वाघमारे, रा. बार्शिटाकळी यांची ( एमएच ३० एके ७७६३) ही दुचाकी वाहन १९ डिसेंबर २०१९ला दुरुस्तीला टाकली. सर्व्हिस सेंटरचे संचालक नाजीर खान यांनी वाहनाची सर्व्हिसिंग, क्लचप्लेट, ऑइल व इतरही पार्टस् बदलावे लागतील, असे सांगितले. नाजीर खान यांनी स्पेअर पार्टस बदलणे व वाहन दुरुस्तीसाठी वाहनधारक बाबाराव वाघमारे यांच्याकडून २ हजार १५५ रुपये घेतले. तसे बिलदेखील दिले. दोन दिवसांतच वाहनधारकास वाहनात काही दोष राहिले असल्याचे लक्षात आले. वाहन पिकअप घेत नसल्याचे नाजीर खान यांच्या लक्षात आणून दिले. पुन्हा थातूरमातूर दुचाकी दुरुस्ती करून दिली. दोष मात्र दूर झाला नाही. त्यामुळे पुन्हा दि. ३ फेब्रुवारी २०२०ला दुचाकी नाजीर खान यांच्याकडे नेली असता, त्यांनी वाहनधारकास उद्धट वागणूक देत, वाहन माझ्याकडे पुन्हा आणू नका असे बजावले. दुचाकीमध्ये खराब झालेली क्लच प्लेट न बदलविता नव्याने ओरिजनल क्लच प्लेट टाकली नसल्याने वाहन पिकअप घेत नव्हते. ग्राहकाची फसवणूक झाल्यामुळे वाघमारे यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. ग्राहक मंचाने पॉप्युलर हिरो होंडा सर्व्हिस सेंटरचे संचालक नाजीर खान यांनी वाहन दुरुस्ती खर्चाची रक्कम २ हजार १५५ रुपये व त्रासापोटी दोन हजार रुपये असे ४ हजार १५५ रुपये वाहनधारकास द्यावे, असा निकाल ग्राहक मंच अकोला न्यायालयाचे अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य सुहास आळशी व उदयकुमार सोनवणे यांनी दिला.

Web Title: Hero Honda Service Center hits customer forum!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.