बाश्रीटाकळी वन विभागाचा हायटेक प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 08:19 PM2017-10-04T20:19:04+5:302017-10-04T20:21:01+5:30
सायखेड (अकोला): वन्य जीव सप्ताहानिमित्त वनासह वन्य जीव संरक्षणासाठी बाश्रीटाकळी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून गांधी जयंतीच्या पर्वावर हायटेक प्रचारास प्रारंभ झाला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्राच्या हद्दीतील गावागावांमध्ये वन्य जीव संरक्षणाचे महत्त्व दाखविणारे फलक लावलेली वन विभागाची प्रचार व्हॅनसह रॅली काढून जनजागती करणार आहेत. हा सप्ताह १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, वनपाल, वनरक्षक, वनमजूर, वन समिती संयुक्तपणे हा हायटेक प्रचार करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

धाबा येथील कार्यालय परिसरात २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता व ५0 वृक्षांची लागवड करून या वन्य जीव सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. या सप्ताहामध्ये वनपाल आर.आर. पवार, टी.व्ही. शिंदे, पी.टी. काकड, एस.पी. राऊत, एम.एम. शेख, वनरक्षक पी.बी. भागवत, आर.यू. राठोड, एल.डी. जाधव, जी.एच. ठाकरे, सी.एम. तायडे, एस.पी. राठोड, ए.एस. धोत्रे, एम.ए. थोरात, के.एस. बागवान, जी.एस. घाटोळे, एम.डी. राठोड, अरुण घुमसे, डी.जे. इंगळे, अरुण खंडारे आदींसह वनमजूर व ठिकठिकाणचे वन समितीचे पदाधिकारी सहभागी होऊन प्रचार करणार आहेत.
ज्याप्रमाणे जंगलतोड, वन तस्करीला पायबंद घालण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला, त्याचप्रमाणे जंगलातील पशू, पक्षी, हिंस्र प्राण्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा.
- विवेक लाड, वन परिक्षेत्र अधिकारी, धाबा.