पारस विद्युत प्रकल्पातील आगीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:44+5:302021-03-31T04:18:44+5:30

पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्रमांक ३ व ४ या दोन्ही संचांमध्ये शुक्रवारी व शनिवारी सलग दोनदा ...

High level inquiry into the fire at the Paras power plant? | पारस विद्युत प्रकल्पातील आगीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा?

पारस विद्युत प्रकल्पातील आगीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा?

Next

पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्रमांक ३ व ४ या दोन्ही संचांमध्ये शुक्रवारी व शनिवारी सलग दोनदा आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मनीष तिवारी यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे यांच्याकडे ई-मेलवर पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

पारस औष्णिक विद्युत प्रकल्पात सातत्याने आगीच्या घटना घडत असून प्रभारी अधीक्षक अभियंता सचिन भगेवार यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळेच आगीच्या घटना घडत असून त्यांच्याकडील प्रभार त्वरित काढून घेऊन आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. पारस औष्णिक प्रकल्पातील कोल मिलमध्ये लागलेल्या आगीबाबत मुख्य अभियंता यांनी कोणतीही जबाबदारी निश्चित केली नाही. सदरच्या आग लागण्याच्या घटना या कंत्राटदाराच्या फायद्याच्या असल्याची चर्चा या परिसरात आहे. तसेच सचिन भगेवार यांच्याकडे कार्यकारी अभियंता तसेच एकूण तीन पदांचा प्रभार असतानाही तसेच अन्य ज्येष्ठ अनुभवी अधिकारी असताना अधीक्षक अभियंता पदाचा प्रभार भगेवार यांना देण्यामागील हेतूची चौकशी करण्याचेही निवेदनात नमूद केले आहे. केंद्रातील कोल मिलमध्ये लागलेल्या आगीत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून शेकडो पक्षी मॄत्युमुखी (कबुतरे) पडली आहेत. या घटनेबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयानेसुद्धा ताशेरे ओढले असून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन लाख रुपये दंड केला असून सदरच्या दंडाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची तसेच अधीक्षक अभियंता पदाचा प्रभार त्वरित सक्षम व ज्येष्ठ अनुभवी अधिकाऱ्याकडे देण्यात यावा तसेच गत दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले कार्यरत कार्यकारी अभियंता यांची बदली करण्यासह आगीच्या घटनेबाबत जबाबदार धरून कठोर कारवाईची मागणी निवेदनातून केली आहे.

Web Title: High level inquiry into the fire at the Paras power plant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.