कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक मृत्यू ५० वर्षावरील वयोगटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:28+5:302020-12-06T04:19:28+5:30

वयोगटानुसार स्थिती वयोगट - रुग्णसंख्या ० ते ५ - ...

The highest number of deaths in the first wave of corona virus is in the age group of 50 years and above | कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक मृत्यू ५० वर्षावरील वयोगटातील

कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक मृत्यू ५० वर्षावरील वयोगटातील

Next

वयोगटानुसार स्थिती

वयोगट - रुग्णसंख्या

० ते ५ - ००

५ ते १० - ००

११ ते २० - ००

२१ ते ३० - ०९

३१ ते ४० - १७

४१ ते ५० - ३९

५१ ते ६० - ७४

६० पेक्षा जास्त - १५९

८३ जणांचा सप्टेंबरमध्ये मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर सप्टेंबर महिन्यात दिसून आला. सप्टेंबरच्या ३० दिवसांत ३ हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण, तर ८३ जणांचा मृत्यू झाला होता. मागील आठ महिन्यातील हा सर्वाधिक मोठा आकडा आहे. ऑक्टोबर महिन्यात मात्र मृत्यूचा दर काही प्रमाणात नियंत्रणात आला होता.

ग्रामीण भागात जास्त मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव हा महापालिका क्षेत्रातून झाला; मात्र हळूहळू कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागातही होऊ लागला. महापालिका क्षेत्रात थैमान घातल्यावर ग्रामीण भागातही कोरोनाचे बळी जाऊ लागले. जिल्ह्यात आतापर्यंत २९८ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला असून, त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण - ९,६२६

उपचारानंतर बरे झालेले रुग्ण - ८,६७९

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ६४९

Web Title: The highest number of deaths in the first wave of corona virus is in the age group of 50 years and above

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.