शहरात पूर्व, दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचा सर्वाधिक प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:19 AM2021-03-17T04:19:34+5:302021-03-17T04:19:34+5:30
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यासह शहरातील जीवनमान पुन्हा एकदा प्रभावित झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये काेराेनाचा आलेख घसरल्याचे चित्र हाेते. ...
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यासह शहरातील जीवनमान पुन्हा एकदा प्रभावित झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये काेराेनाचा आलेख घसरल्याचे चित्र हाेते. जानेवारीच्या अखेरीस पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येचा वाढता आलेख लक्षात घेता शासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात काेराेनाने डाेके वर काढल्याचे समाेर येताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. महापालिका क्षेत्रात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये काेराेनाचे सर्वाधिक बाधित रुग्ण पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच या दाेन्ही झाेनमध्ये काेराेना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढल्याचे समाेर आले आहे. मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार महापालिका क्षेत्रातील १८२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये सर्वाधिक बाधित १५१ रुग्ण पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून आले आहेत.
पूर्व व दक्षिण झाेनकडे मनपाचे दुर्लक्ष
काेराेनाची लागण झालेल्या १८१ रुग्णांमध्ये सर्वाधिक बाधित व्यक्ती पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून आले आहेत. यामध्ये पूर्व झोन- ७६, पश्चिम झोन-१८, उत्तर झोन- १३ आणि दक्षिण झोन मध्ये ७५ रुग्ण काेराेना बाधित निघाले. या दाेन्ही झाेनमधील वाढती रुग्णसंख्या पाहता मनपा प्रशासनाने कठाेर उपाययाेजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
अकाेलेकरांनाे काळजी घ्या!
शहरात दिवसेंदिवस काेराेनाचा संसर्ग वाढत चालला असताना नागरिक कमालीचे बेफिकीर व बेजबाबदारापणे वागत असल्याचे दिसत आहे. घराबाहेर निघताना ताेंडाला मास्क किंवा रुमाल लावणे, हाताला सॅनिटायझर लावणे, आपसात चर्चा करताना किमान चार फूट अंतर राखणे गरजेचे झाले आहे. स्वत:ची काळजी घेतली तरच कुटुंबीयांची काळजी घेता येणार असल्याचे आवाहन मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी केले आहे.