मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:46+5:302021-07-22T04:13:46+5:30
सूर्यफुलाची शून्य क्षेत्रात लागवड! अकोला : एकेकाळी मोठ्या प्रमाणात लागवड होणारे सूर्यफुलाचे पीक नामशेष होत चालले आहे. या खरीप ...
सूर्यफुलाची शून्य क्षेत्रात लागवड!
अकोला : एकेकाळी मोठ्या प्रमाणात लागवड होणारे सूर्यफुलाचे पीक नामशेष होत चालले आहे. या खरीप हंगामात कृषी विभागाने १७४ हेक्टर क्षेत्रात या पिकाची लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली होती; परंतु जिल्ह्यात या पिकाची कुठेच लागवड झाली नाही.
तंटामुक्त समितींचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष
अकोला : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. गाव तंटामुक्त होईपर्यंत समित्यांचा जोर होता. गाव तंटामुक्त झाले व बक्षिसांची रक्कम मिळाल्यानंतर समित्यांनी तंट्यांकडे दुर्लक्ष केले. गाव तंटामुक्त झाल्यास बक्षीस रकमेची गरज आहे.
प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
अकोला : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे, ग्राहक, व्यापाऱ्यांची कुचंबणा होत आहे.
विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
अकोला : गत काही दिवसांपासून शहरातील गीता नगर भागात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात कितीतरीवेळा विजेचा पुरवठा खंडित होतो. विजेच्या अशा लपंडावामुळे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खराब होण्याची शक्यता अधिक असते; परंतु या समस्येकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही, असे दिसून येत आहे. तरीपण विजेची ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
बँकेसमोर अस्ताव्यस्त पार्किंग
अकोला : खुले नाट्यगृह चौकानजीक असलेल्या बँक ऑफ इंडियासमोर ग्राहक दुचाकीची अस्ताव्यस्त पार्किंग करीत आहेत. त्यामुळे येथे वाहन उभे करण्यास अडचणीचे ठरत आहे. या बँकेत दररोज शेकडो ग्राहक येत असतात. बँकेला लागूनच अनेक दुकाने आहेत. रस्त्यावर दुचाकी उभ्या राहत असल्याने बँकेत जाणाऱ्यांनाही चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
युवकांनी पुन्हा मुंबई, पुणे गाठले!
अकोला : कोरोनाच्या उद्रेकामुळे आंतरजिल्हा, आंतरराज्यात काम करणारे स्वगृही परतले होते; मात्र कोरोना नियंत्रणात आल्याने आणि निर्बंध शिथिल झाल्याने आता पुन्हा जिल्ह्यातील युवक त्यांच्या कामासाठी पुणे, मुंबई तसेच परराज्य गाठत असल्याचे दिसून येत आहे.