महामार्गावरील बसथांबे ठरताहेत मृत्यूचे प्रवेशद्वार!

By Admin | Published: December 3, 2014 01:08 AM2014-12-03T01:08:52+5:302014-12-03T01:08:52+5:30

गावांसमोरील प्रवासी निवारे बनले शोभेच्या भिंती.

Highway on the highway, the entrance to death! | महामार्गावरील बसथांबे ठरताहेत मृत्यूचे प्रवेशद्वार!

महामार्गावरील बसथांबे ठरताहेत मृत्यूचे प्रवेशद्वार!

googlenewsNext

नितीन गव्हाळे / अकोला
अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व जिल्ह्यातील राज्य मार्गांंवर रात्रंदिवस वाहने धावतात. कोणाचेही नियंत्रण नसल्याने महामार्गांंवरील वाहतूक बेताल झाली आहे. अशातच गावांजवळील बसथांब्यांवर किंवा रस्त्याच्या कडेला बस-ऑटोरिक्षांची वाट पाहणारे प्रवासी जीव धोक्यात घालून उभे असतात. अलीकडे बसथांब्यांजवळ, गावाजवळून जाणार्‍या महामार्गांंवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच महामार्ग व राज्य मार्गांंवरील बसथांबे प्रवाशांसाठी मृत्यूचे प्रवेशद्वार बनले आहेत.
ह्यलोकमतह्ण चमूने मंगळवारी दुपारी व्याळा ते कुरणखेडपर्यंंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत शासन किती निष्काळजी आहे, हेच दिसून आले. शहरातून, गावातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गांंवर शेकडो ठिकाणी बसथांबे आहेत. दररोज हजारो प्रवासी बस व इतर वाहनांची वाट पाहत विविध ठिकाणच्या बसथांब्यांवर थांबतात. या थांब्यावर स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवासी उभे असतात. दरम्यान, या प्रवाशांच्या जवळून अनेक जड वाहने, ट्रॅव्हल्स, ट्रक, कंटेनरसारखी वाहने भरधाव निघून जातात. अशा वाहनांनी प्रवाशांना धडक देऊन जखमी केल्याच्या किंवा त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. १६ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्हय़ातील पारगाव येथे बसची वाट पाहत असलेल्या आठ प्रवाशांना एका कंटेनरने चिरडल्याने आठही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेसारख्याच अकोला जिल्हय़ातही अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत; परंतु या घटना किरकोळ स्वरूपाच्या होत्या. तथापि. भविष्यात बसथांब्यांवरसुद्धा पारगावच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Highway on the highway, the entrance to death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.