महामार्गाचे काम अपूर्ण; अनेकांच्या घरांत शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:22+5:302021-09-08T04:24:22+5:30
हैदराबाद ते इंदौर या राष्ट्रीय महामार्गाचे पातूर ते पारस फाट्यापर्यंत रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी झाले आहे. ...
हैदराबाद ते इंदौर या राष्ट्रीय महामार्गाचे पातूर ते पारस फाट्यापर्यंत रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी झाले आहे. या महामार्गाचे काम करताना अनेक मोठमोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे; मात्र विद्युत खांब जैसे थे आहेत. दुसरीकडे संबंधित कंत्राटदाराने हलगर्जी करीत महामार्गाच्या दुतर्फा भराव म्हणून पिवळी माती टाकल्याने अनेक वाहने घसरून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांचे काम अपूर्ण असल्याने अकोला नाका परिसरातील नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरले होते. याबाबत अकोला नाका परिसरातील नागरिकांनी आ. नितीन देशमुख यांना माहिती देऊन नाल्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
--------------------
शेतात साचले पाणी
महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे महामार्गानजीक असलेल्या अनेक शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन महामार्गाच्या नाल्यांचे काम करण्याची मागणी होत आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे.