महामार्ग चौपदरीकरणाचे घोडे नव्याने धावणार
By Admin | Published: November 7, 2014 12:57 AM2014-11-07T00:57:10+5:302014-11-07T00:57:10+5:30
कामाचे कंत्राट देण्याचे नियोजन सुरू.
अकोला : अमरावती ते जळगाव आणि जळगाव ते गुजरात या ५५५ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे नव्याने कंत्राट देण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रियादेखील सुरू होणार असल्याने, महामार्ग चौपदरीकरणाचे अडलेले घोडे नव्याने धावणार आहेत.
अमरावती ते जळगाव २७५ आणि जळगाव ते गुजरातपर्यंत २८0 किलोमीटर अशा दोन ट प्प्यांतील एकूण ५५५ किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे कंत्राट दीड वर्षांपूर्वी एल अँन्ड टी कंपनीला देण्यात आले होते. अकोला जिल्ह्यातून जाणार्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी जमिनीचे हस्तांतरण व त्यापोटी संबंधित शे तमालकांना मोबदला देण्याची प्रक्रियादेखील महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आली. चौपदरीकरणाच्या कामासाठी या महामार्गावरील झाडे तोडण्यासह साफसफाईचे कामही करण्यात आले; मात्र गेल्या वर्षभरापासून एल अँन्ड टी कंपनीमार्फत महामार्ग चौपदीकरणाचे काम सुरू करण्यात आले नाही. काम करण्यास े नकार दिल्याने आणि काम सुरू करण्यात आले नसल्याने गेल्या १0 सप्टेंबर रोजी एल अँन्ड कंपनीसोबत झालेला कारारनामा केंद्र शासनामार्फत समाप्त करण्यात आला. जुना करारनामा रद्द करण्यात आल्याने महामार्ग चौ पदरीकरणाच्या कामाचे नव्याने कंत्राट देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच निविदा मागवल्या जातील.