दुर्गोत्सव मंडळांना हिंदू गौरव पुरस्काराने सन्मानित करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 07:32 PM2017-09-24T19:32:31+5:302017-09-24T19:33:10+5:30
अकोला : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथप्रणित विश्व हिंदू महासंघाच्यावतीने अकोला जिल्हय़ातील नवरात्रामधील नवदुर्गोत्सव मंडळांच्या झांकी, देखाव्यांना हिंदू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महासंघाची परीक्षण चमू जिल्हय़ातील विविध नवरात्र मंडळांना भेटी देऊन देखाव्यांचा तपशील संकलित करीत आहेत. जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी येथील स्थानिक पदाधिकारी हे कार्य करीत असून, मंडळांची माहिती देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील सर्व दुर्गादेवी वा नवरात्र मंडळांनी परीक्षण समि तीला देखाव्यांची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन विश्व हिंदू महासंघाचे विदर्भ अध्यक्ष योगेश श्रावगी, जिल्हाध्यक्ष विवेक भरणे, महानगराध्यक्ष निहार अग्रवाल, प्रदेश उपाध्यक्ष राजेश अग्रवाल, ओमप्रकाश श्रावगी, केशव पोद्दार, महानगर महामंत्री अँड. गणेश परिहार, सोनू ठाकूर, मनीष सुरेका, संजय वर्मा, रवी अग्रवाल, राजेश केजडीवाल व गोपी चाकर आदींनी केले.