ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर!

By admin | Published: May 26, 2014 12:46 AM2014-05-26T00:46:10+5:302014-05-26T01:13:56+5:30

अकोला शहराचे वैभव व शहराची ओळख असलेल्या असदगड किल्लय़ाची दुरवस्था होत आहे.

Historical architecture on the way to extinction! | ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर!

ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर!

Next

अकोला : शहराचे वैभव व शहराची ओळख असलेल्या असदगड किल्लय़ाची दुरवस्था होत आहे. किल्लयाच्या भिंतींची पडझड होत असून, या ठिकाणी सध्या सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे किल्लय़ाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या किल्ल्यावरील प्रमुख वास्तू पडल्या असून, हवाखाना म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका इमारतीचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याच्या भिंतीचा उपयोग आजूबाजूचे लोक गोवर्‍या थापण्यासाठी करीत आहेत. तसेच या परिसरातील मातीचीही चोरी होत आहे. तीनशे वर्षांपूर्वी असद खॉ नावाच्या औरंगजेबाच्या सरदाराने हा किल्ला बांधला असल्यामुळे त्याला ह्यअसदगडह्ण असे नाव पडले. पूर्वी अकोल्याचा मुख्य कारभार बाळापूर येथून पाहिल्या जात होता. अकोला केवळ एक परगणा होता. सोळाव्या शतकात मोगल सम्राट औरंगजेब याने वर्‍हाड प्रांत जिंकला. त्याने शेतसारा वसुलीसाठी मोगली सरदारांची नेमणूक केली व त्यांना काही परगणे वाटून दिले. असद खॉ नावाच्या एका सरदाराला औरंगजेबाने अकोला हे गाव दिले. असद खॉने इ.स. १६९७ मध्ये ख्वाजा अब्दुल लतीफ याच्या देखरेखीखाली अकोला गावाच्या चारही बाजूने एक परकोट बांधला. येथे पूर्वेकडे हवाखाना इमारत आहे. येथेच असद खॉ राहत होता व गावाचा कारभार पाहत होता.

Web Title: Historical architecture on the way to extinction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.