अकोला विधी सेवेतील ऐतिहासिक परंपरा प्रशंसनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:08 AM2017-09-04T02:08:30+5:302017-09-04T02:08:40+5:30
अकोला : विधी क्षेत्रात अकोल्यातील विधी सेवेची एक ऐतिहासिक परंपरा असून, ती नव्यानेच आलेल्या विधिज्ञांसाठी प्रेरणादायी आहे, तर ही सेवा राज्यामध्ये प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानवृत्त न्यायाधीश व्ही. एस. शिरपूरकर यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विधी क्षेत्रात अकोल्यातील विधी सेवेची एक ऐतिहासिक परंपरा असून, ती नव्यानेच आलेल्या विधिज्ञांसाठी प्रेरणादायी आहे, तर ही सेवा राज्यामध्ये प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानवृत्त न्यायाधीश व्ही. एस. शिरपूरकर यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
जिल्हा न्यायालयाच्या आवारात संगणकीय विधी पुस्तकालय व अनुसंधान केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अकोल्यातील विधी सेवेचा राष्ट्रीय पातळीवर गवगवा असून, नवीन वकील वर्गाने या महान परंपरेचे पाईक होऊन कायदेविषयक ज्ञान अधिक उंच करावे, असे आवाहनही शिरपूरकर यांनी केले. जिल्हा सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर उच्च नायालय वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड. अनिल मार्डीकर, उच्च नायालयाचे अँड. मनोज शर्मा, जिल्हा सरकारी वकील अँड.गिरीश देशपांडे, अँड.बी.के. गांधी. अँड. मोतीसिंह मोहता, अँड. परिमल पांडे, अँड. संग्राम शिरपूरकर, राजश्री मार्डीकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सत्यनारायण जोशी यावेळी उपस्थित होते. अँड. सत्यनारायण जोशी यांच्या संकल्पनेतून स्व.किसनीबाई श्रीराम जोशी यांच्या स्मृतीत जिल्हा नायायालयातील बार रूममध्ये रविवारी संगणकीय विधी पुस्तकालय व अनुसंधान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अँड.मुन्ना खान, अँड.बी.के. गांधी, अँड. महेश शाह, अँड.एस.डी. तायडे, अँड.सी. जी. कोठारी, अँड. चंद्रकांत वानखडे, अँड.सी.ए. जोशी, अँड. सतीश भुतडा, अँड.बाळासाहेब वखरे, अँड. शरद इंगळे आदींच्या हस्ते मान्यवरांचा शाल नारळ देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक ई-पुस्तकालयाचे संयोजक अँड. सत्यनारायण जोशी यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष अँड.गजानन खाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँड. इलियास शेखानी, अँड. प्रवीण इंगळे, अँड. सुमित बजाज, अँड. गिरिराज जोशी, अँड. अभिषेक चांडक, अँड. अनिसा शेख, अँड. गोपाल चतुर्वेदी यांनी प्रयत्न केले. यावेळी न्यायाधीश अमृत बिराजदार, सत्र न्यायाधीश के.जी. भालचंद, अ. सा. जाधव, व्ही. डी. केदार, पाटील, शिंगाडे, कोकरे, वरिष्ठ न्यायाधीश अन्सारी, दाभाडे, कमलमे जयसिंघानिया, नन्नावरे, हरणे, रेडकर, शाहदनी, राऊत, न्यायालय व्यवस्थापक अभिजित जाताईकर, विधी सेवा अधीक्षक राजेंद्र निकुंभ, अशोक लव्हाळे, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एन.जी. शुक्ल उपस्थित होते.