अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 18:58 IST2020-11-16T18:57:57+5:302020-11-16T18:58:03+5:30
Akola Accident News बार्शीटाकळी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वार ठार
विझाेरा: पिंपळखुटा ते बार्शीटाकळी मार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पिंपळखुटा गावाजवळ घडली. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळखुटा येथील दिनेश प्रकाश शिंदे (२५) हा युवक १५ नाेव्हेंबर राेजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतात रखवाली करण्यासाठी एमएच ३० एक्स ५५२२ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना विरुध्द दिशेने भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दिनेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वाहनाचालक घटनास्थळावर पसार झाला. अरुंद रस्ता त्यातही माेठमाेठे खड्डे असल्याने असलेली सातत्याने अपघात घडत आहेत. या मार्गावर एक माेठा स्टाेन क्रशरच्या खदानीतून होत असलेले गाैण खनिजाच्या उत्खननाच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.