शाश्वत दूध उत्पादनासाठी आनुवंशिक सुधारणेची कास धरा - विश्वास चितळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:15 AM2021-06-04T04:15:39+5:302021-06-04T04:15:39+5:30
संस्थेचे मा. सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांचे अध्यक्षतेखाली सदर चर्चासत्राचे प्रास्ताविक प्रा. डॉ. चैतन्य पावशे, विभागप्रमुख, ...
संस्थेचे मा. सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांचे अध्यक्षतेखाली सदर चर्चासत्राचे प्रास्ताविक प्रा. डॉ. चैतन्य पावशे, विभागप्रमुख, पशू प्रजनन व स्त्री प्रसूतिशास्त्र विभाग यांनी केले. याप्रसंगी गोविंद डेअरी, फलटण, सातारा येथील महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. गायकवाड यांनी शाश्वत दूध उत्पादनासाठी मुक्त संचार गोठा तसेच स्मार्ट पद्धतीचा अवलंब करत उत्पादन खर्च कमी करण्याबाबत माहिती विशद केली.
समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. भिकाने यांनी शाश्वत दूध उत्पादनासह मूल्यवर्धित उत्पादनातून फायदेशीर दूध व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. सदर ऑनलाइन चर्चासत्रास एकूण १०० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि पशुपालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. महेश इंगवले यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण बनकर यांनी मानले.