नोकर भरतीसाठी महाबँक कर्मचाऱ्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:24 AM2021-09-16T04:24:24+5:302021-09-16T04:24:24+5:30
या आंदोलनाची माहिती देतानाचे बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष शाम माईणकर म्हणाले की, बँकेतील ११४५ शाखांतून सफाई ...
या आंदोलनाची माहिती देतानाचे बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष शाम माईणकर म्हणाले की, बँकेतील ११४५ शाखांतून सफाई कर्मचारी नेमले नाहीत, ६४५ शाखांमध्ये शिपाई नाहीत, ३६० शाखांमध्ये सफाई कर्मचारी नाहीत, सफाई कर्मचारी व शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत. याचा बँकेच्या ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे. याशिवाय मृत्यू, सेवानिवृत्ती, पदोन्नती, स्वेच्छानिवृत्ती यामुळे रिक्त झालेल्या लिपिकांच्या जागा भरलेल्या नाहीत, अशा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये माईणकर, प्रवीण महाजन, अतुल वर्मा, श्याम वानखडे, जितेंद्र येळमे, अविनाश आखरे, सतीश धुमाळे, राजेंद्र तोमर, किशोर आलेकर, दीपक पुंडकर, प्रशांत शेळके, विशाल गायकवाड, अनिल मावळे, अनिल बेलोकर, सुदर्शन सोनोने, शुभांगी मानकर, शिल्पा ढोले, फैजल हुसैन, राजेंद्र मिश्रा आदी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आता लाक्षणिक संप
यापुढे २२ सप्टेंबर रोजी बँकेचे मुख्यालय पुणे येते महाधरणे आयोजित करण्यात येणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी महाबँकेतील कर्मचारी एकदिवसीय, तर २१ आणि २२ ऑक्टोंबर रोजी असे २ दिवस लाक्षणिक संपावर जाणार आहेत.