होळी स्पेशल रेल्वेगाडी शनिवारी; अकोला मार्गे काचीगुडा-बिकानेर

By Atul.jaiswal | Published: March 1, 2023 02:03 PM2023-03-01T14:03:50+5:302023-03-01T14:06:13+5:30

या गाडीच्या अप व डाऊन अशी प्रत्येकी एकच फेरी होणार आहे.

Holi Special train on Saturday; Kachiguda-Bikaner via Akola | होळी स्पेशल रेल्वेगाडी शनिवारी; अकोला मार्गे काचीगुडा-बिकानेर

होळी स्पेशल रेल्वेगाडी शनिवारी; अकोला मार्गे काचीगुडा-बिकानेर

googlenewsNext

तुल जयस्वाल/अकोला 

अकोला : आगामी होळी सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने शनिवार, ४ मार्च रोजी काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा होळी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अप व डाऊन मार्गावरील दोन्ही गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०७०५३ काचीगुडा-बिकानेर होळी विशेष ही गाडी शनिवार, ४ मार्च रोजी काचीगुडा स्थानकावरून २१.३० वाजता रवाना होऊन सोमवारी दुपारी ३.५० वाजता बिकानेर येथे पोहोचणार आहे. ही गाडी रविवारी सकाळी ९.२० वाजता अकोला स्थानकावर येईल.
परतीच्या प्रवासात ०५७५४ बिकानेर-काचीगुडा होळी विशेष ही गाडी मंगळवार, ७ मार्च रोजी बिकानेर स्थानकावरून १९.५० वाजता रवाना होऊन गुरुवारी ८.५० वाजता काचीगुडा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी अकोला स्थानकावर बुधवारी २१.३० वाजता येणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशी प्रत्येकी एकच फेरी होणार आहे.

Web Title: Holi Special train on Saturday; Kachiguda-Bikaner via Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.