क्षणिक सुखासाठी गमवावे लागणार घर अन् वावर!

By admin | Published: February 15, 2016 02:35 AM2016-02-15T02:35:12+5:302016-02-15T02:37:16+5:30

पीएसआयवर अजब संकट, युवतीशी ‘मधुर’ संबध अंगलट.

Home and water will be lost for transient happiness! | क्षणिक सुखासाठी गमवावे लागणार घर अन् वावर!

क्षणिक सुखासाठी गमवावे लागणार घर अन् वावर!

Next

सचिन राऊत / अकोला: जिल्ह्यातील एका पीएसआयने भंडारा येथून ह्यतिलाह्ण खास कामासाठी अकोल्यात आणले.. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये दोघेही रात्रभर राहिले.. मनोमिलनही झाले.. त्यानंतर तो सकाळी फ्रेशह्ण होण्यासाठी गेला.. तिने संधी साधून त्याच्या मोबाइलमधील महत्त्वाचे संपर्क क्रमांक मिळविले.. काही वेळाने तो निघून गेला.. यानंतर मात्र तिने खरे रूप दाखवत त्याच्या वरिष्ठांना फोन करून प्रकरण निपटविण्यासाठी त्याचे घर किंवा वावर आपल्या नावावर करून देण्यासाठी गळ घातली.. तिचे हे रूप पाहून तो तापाने फणफणला आणि आजारी रजेवरच निघून गेला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पीएसआयने त्याच्या ओळखीतील एका मैत्रिणीला खास कामासाठी अकोल्यात आणले होते. रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये दोघांचे रात्रभर मनोमिलन झाले. सदर पीएसआयला ड्युटीवर जाण्याची घाई असल्याने तो सकाळी लवकर फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. ही संधी साधून सदर युवतीने त्याच्या मोबाइलमधील वरिष्ठ अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक मिळवून डाव साधण्यास सुरुवात केली. पीएसआय बाथरूममधून परत आला आणि तिला सांगून निघून गेला. त्यानंतर मात्र या युवतीने शहरा तील एका पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना फोन करून पीएसआयने सर्वस्व लुटल्याची तक्रार केली. संबधित अधिकार्‍याने तो पीएसआय ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगितले. यावरून युवतीने ग्रामीण भागातील पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून, घडलेला प्रकार त्यांना सांगितला. सदर पीएसआयची तक्रार करण्याची धमकीही या युवतीने दिली आणि तक्रार करायची नसेल, तर पीएसआयने त्याचे घर किंवा वावर आपल्या नावावर करून द्यावे, अशी गळ या युवतीने पोलीस अधिकार्‍याजवळ घातली. या संपूर्ण प्रकाराबाबत अनभिज्ञ असलेल्या संबधित पोलीस अधिकार्‍याने पीएसआयशी संपर्क साधला. पीएसआयला त्याने केलेल्या मनोमिलनाचा प्रकार तक्रारीपर्यंंत पोहोचल्याचे सांगताच सदर पीएसआय आजारी रजेवर गेले. हा प्रकार युवतीला माहिती पडताच तिने ठाणेदारापर्यंंत सीमीत न राहता या प्रकरणाची मौखिक तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांपर्यंंत केली. त्यावेळीही तिने घर अन् वावराची मागणी रेटून धरली. त्यामुळे युवतीसोबत घालविलेली ती रात्र पीएसआयला लाखमोलाची ठरली असून, त्याची नोकरी, घर अन् वावर तिने पणाला लावलं आहे. या प्रकाराची पोलीस खात्यात चांगलीच चर्चा.

Web Title: Home and water will be lost for transient happiness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.